हतनूर धरणाचे आठ दरवाजे पूर्ण उघडले : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Hatnoor dam’s eight gates fully open: warning to riverside villages भुसावळ (28 ऑगस्ट 2024) : हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे सुरूवातीला धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले व नंतर आठ दरवाजे बंद करून आठ दरवाजातून विसर्ग केला जात आहे. रविवारी दुपारी 18 व त्यानंतर सायंकाळी एकूण 20 दरवाजातून विसर्ग सुरू होता मात्र सोमवारी काही अंशी आवक कमी झाल्याने चार दरवाजे बंद करण्यात आले व नंतर पुन्हा आठ दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान, आवक कायम असल्याने तापी नदी दुथळी भरुन वाहत आहे. हतनूर प्रशासनाने तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून पाऊस
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात येणार्या बर्हाणपूर, टेक्सा, देडतलाई, गोपाळखेडा, चिखलदरा, लोहारा, अकोला आदी सर्वच स्थानकांवर पाऊस सुरु आहे. यामुळे धरणात दररोज आवक कायम आहे. रविवारी रात्री दहा वाजता हतनूरचे 20 दरवाजे पूर्ण उघडून दोन 748 क्युमेक्स वेगाने विसर्ग करण्यात आला होता.

सोमवारी दुपारपर्यंत हा विसर्ग कायम होता. सोमवारी दुपारी दोन वाजता काही प्रमाणात आवक कमी झाल्याने चार दरवाजे बंद करण्यात आले. यानंतर 16 दरवाजांतून 1724 क्युमेक्स अर्थात 60 हजार 883 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. विसर्गानंतरही धरणात 205. 40 दलघमी जलसाठा कायम आहे. तर 210.280 मिटर जलपातळी स्थिर ठेवण्यात आली आहे. हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने तापी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
