आमदार खडसेंचा दावा : देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल करण्याचा शब्द दिला !


MLA Khadse’s claim : Devendra Fadnavis promised to make him governor! मुंबई (13 सप्टेंबर 2024) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांचा गेल्या काही महिन्यांपासून भाजपा प्रवेश रखडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे प्रवेश होवू न शकल्याचा आरोप अलीकडे खडसेंनी केला होता तर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार खडसेंनी आपणास राज्यपाल करण्याचा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचा दावा करीत आपल्या नावाची शिफारस केली मात्र पुढे त्याचे काय झाले ? याची कल्पना नसल्याचे सांगून खळबळ उडवून दिली.

खडसेंचा दावा : फडणवीसांनी मुलीची शप्पथ घेतली
आमदार खडसे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी बोलावल्यानंतर त्यांची भेअ घेतली व त्यावेळी त्यांनी आपल्याला नाथाभाऊ, तुम्हाला मी राज्यपाल करतो. त्यासाठी तुमच्या नावाची शिफारस करतो,’ असे सांगितले होते. यावेळी मी त्यांना म्हटलं, तुम्ही खरं खरं सांगा. कारण तुम्ही बरंच सांगता पण होत काहीच नाह. त्यामुळे विश्वास बसत नाही. तर ते म्हणाले, तुम्हाला राज्यपाल करू. माझ्या एकुलत्या एका लेकीची शपथ घेऊन मी हे सांगतो. मी माझ्या एकुलत्या एका लेकीची शपथ घेतोय, हे देवेंद्रजींचे त्यावेळचे शब्द होते. मी आता ही बाब जाहीरपणे सांगतोय, असे सांगून खडसेंनी खळबळ उडवून दिली.

भाजपात प्रवेश करणार का ? खडसे स्पष्टच म्हणाले
माझी भाजपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती मात्र दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केला. दिल्लीत मी असताना जे.पी.नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला. यावेळी खासदार रक्षा खडसेही उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी माझ्या गळ्यात भाजपचा मफलर घातला व या गोष्टीला सहा महिने झाले. आपल्या प्रवेशाची घोषणा झालीच नाही त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आपण फुली मारल्याचा दावाही यावेळी खडसे यांनी केला आहे. 40 वर्ष भाजपासाठी काम केले व या पक्षात मला प्रवेश द्या, ही विनंती करणे माझ्यासाठी अतिशय अपमानास्पद असल्याचे यावेळी आमदार खडसे म्हणाले.

 


कॉपी करू नका.