बीएसएफ जवानांची बस नदीत कोसळली : काश्मिरच्या बडगाममध्ये तिघांचा मृत्यू

0

जम्मू काश्मिर (20 सप्टेंबर 2024) : बीएसएफ जवानांची बस नदी पात्रात कोसळून झालेल्या अपघातात तीन जवांनाचा मृत्यू ओढवला. काश्मीरच्या बडगाममधील वाटरहॉल भागात ही घटना घडली. या अपघातात बीएसएफचे अनेक जवान जखमी झाले आहेत.

सहा जवान गंभीर जखमी
बीएसएफच्या पीआरओने अपघातात बीएसएफच्या तीन जवानांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. अपघातस्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना खानसाहीब आणि बडगाम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथून दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीसाठी बडगामकडे येत असताना हा अपघात झाला. 25 सप्टेंबर रोजी दुसर्‍या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील 26 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. बसमधील 35 जवानांपैकी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.


कॉपी करू नका.