निंबादेवी धरणावरून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
यावल (21 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील सावखेडेसीम व चुंचाळेजवळ असलेल्या निंबादेवी धरणावरून 20 वर्षीय तरुणाची दुचाकी भामट्यांनी लांबवली. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध शुक्रवारी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
सावखेडासीम येथून चुंचाळेकडे जातांना जवळच निंबा देवी धरण आहे. या धरणावर चेतन सोपान बरकले (सिद्धिविनायक शाळेजवळ, आयोध्या नगर, जळगाव) हा तरुण दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.झेड. 6419) द्वारे आला असता त्याने धरणाजवळ दुचाकी लावली. अज्ञात चोरट्याने संधी साधून दुचाकी लांबवली. यावल पोलीस ठाण्यात शुक्रवारी अज्ञात चोरटेविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे.-

