गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसांसह मुक्ताईनगरातील संशयीत जाळ्यात

वरणगाव पोलिसांची गोपनीय माहितीच्या आधारे कामगिरी


Gavathi Katta along with two live cartridges in a suspicious net in Muktai Nagar भुसावळ (23 सप्टेंबर 2024) : गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस बाळगणार्‍या मुक्ताईनगरातील दोघांना वरणगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली. ही कारवाई वरणगाव शहरातील हॉटेल चायलाजवळ बेकायदेशीर रविवार, 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
वरणगाव शहरातील हॉटेल चायला जवळ संशयीत शस्त्रासह येणार असल्याची माहिती वरणगावचे सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. वरणगाव पोलिसांनी रविवार, 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संशयित आरोपी सिध्दार्थ संतोष भालेराव (23, आंबेडकरनगर, मुक्ताईनगर) व अनिरूध्द कैलास ठाकूर (20, सुराणा नगर, मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेतले. संशयीतांच्या अंग झडतीत त्यांच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, चार हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस तसेच पाच हजार रुपये किंमतीचे मॅग्झीन जप्त करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल मनोज म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !