रावेरात गेम अँपव्दारे ऑनलाईन बेटिंग : सहा आरोपी जाळ्यात


Online betting through Ravera game app: Six accused in the net रावेर (24 सप्टेंबर 2024) : मोबाईल फोन व लॅपटॉपच्या सहाय्याने ऑनलाईन गेम अ‍ॅप तयार करुन लोकांना आमिष दाखवून त्यावर पैशांच्या हार-जीतचा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहीत करून पैशांची गुंतवणूक करण्यासाठी प्रलोभन देणार्‍या रावेर शहरातील स्टेशनरोडवरील सुमन नगरातील गुप्त कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत सहा युवकांना ताब्यात घेतले. त्यातील पाच युवक मध्यप्रदेश तर एक नागपूरचा रहिवासी आहे. या कारवाईने ऑनलाईन बेटींग करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातील स्टेशनरोड सुमन नगरातील दत्तु डिगंबर कोळी यांच्या घरात ऑनलाईन बेटिंगसाठी लोकांना प्रलोभन देणार्‍या एक गुप्त कॉल सेंटरवर सहा.निरीक्षक अंकुश जाधव आणि त्यांच्या पथकाने छापा मारला. यावेळी संशयीत अभिषेक अनिल बानिक (19, मनिषनगर, नागपूर), साहिल खान वकिल खान (22, पन्हाना, जि.खंडवा, म.प्र), बलवीर रघुविर सोलंकी (22, जावल, जि.खंडवा, म.प्र), अंकित धर्मेंद्र चव्हाण (19, पन्हाना, जि.खंडवा, म.प्र), साहिद खान जाकिर खान (19, खडकवाणी, ता.कसरावद, जि.खंडवा (म.प्र.), गणेश संतोष कोसल (25, पन्हाना, जि.खंडवा, म.प्र) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम 4,5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

एक लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून नऊ मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, एक लॅपटॉपचे चार्जर, एक एक्सटेंशन बोर्ड असा एकूण एक लाख 15 हजार 700/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी वुड777डॉटकॉम या वेबसाईटवर व्हॉट्सअँपद्वारे लिंक पाठवून लोकांना ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी प्रलोभन दिल्याचा आरोप आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग, पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अंकुश जाधव, हवालदार रवींद्र वंजारी, नाईक सुनील वंजारी, कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, विशाल पाटील, सचिन घुगे, समाधान ठाकूर, संभाजी बिजागरे यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !