रावेर तालुक्यातील प्रलंबित प्रकल्पांसह विकासकामांना निधी द्या
आमदार शिरीष चौधरी यांची मुंबईतील अधिवेशनात मागणी
रावेर : मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार शिरीष चौधरी यांनी तालुक्यातील निधीअभावी प्रलंबित पडलेल्या प्रकल्प आणि विकास कामासंदर्भात निधीची मागणी केली. त्यामध्ये नुकत्याच रावेर, फैजपूर पालिकेची हद्दवाढ झाल्याने या भागाच्या विकासासाठी 20 ते तीस कोटी रुपये तरतुद करण्याची मागणी आमदारांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केली.
आमदारांनी असा सूचवला पर्याय
निधी देण्यास अडचणी असल्यास विकासकामे सुरू करण्यासाठी प्रारंभी पाच ते दहा कोटी निधी मिळावा, असा पर्याय त्यांनी यावेळी सरकारला सांगितला आहे तसेच रावेर तालुक्यात पाच ठिकाणी वाळुचे घाट आहेत मात्र लिलाव झालेला नाही यामुळे सर्वसामान्य नारीकांना वाळू घेणे कठीण झाले आहे. वाळूचा काळाबाजार होत असल्याने त्वरीत या घाटांचे लिलाव करावे व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे मुद्दे त्यांनी मांडले.


तहसीलसह पंचायत समिती इमारतीतील फर्निचरसाठी द्यावा निधी
यावेळी आमदार चौधरी यांनी यावल येथील क्रीडा संकुलाची निम्मी जागा न्यायालयाच्या नवीन इमारती बांधण्यासाठी वापरण्यात येणार असल्याने क्रीडा संकुलाचा प्रकल्प मागे पडेल त्यापेक्षा न्यायालयासाठी दुसरी जागा द्यावी तसेच पंचायत समिती इमारत फर्निचर व विद्युत फिटिंगसाठी निधी आवश्यक असून मागासवर्गीय वस्तीगृहाची इमारत गेली पाच वर्षे तयार होवून उभी आहे. त्यात इलेक्ट्रीक फिटींग तसेच फर्निचर काम झालेले नाही, हा एक प्रकारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. याची पूर्तता होणे गरजेचे आहे तसेच रावेर येथील पोलिस वसाहत पूणर्णपणे मोडकळीस आली असून वापरली जात नाही त्यामुळे त्याला पुर्नबांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
शेळगांव बॅरेजचे उर्वरीत निधि मंजूर करा
तापी खोरे विकास महामंडळाने 2013 मध्ये 65 मेगाव्हॅटच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती मात्र काही कारणामुळे तो ठप्प झाला होता तो पुन्हा पुर्नजीवीत करावा ज्यातून 50 मेगावॅटसाठी वीज निर्मिती होऊ शकेल शेळगांव बॅरेजचे काम पूर्ण करण्यासाठी 150 कोटी रुपयांची मागणी असतांना राज्य शासनाने 92 कोटी रूपये मंजूर केल्याने उर्वरीत 58 कोटी निधीदेखील मंजूर करून द्यावा, अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे.
