माळेगाव, चारठाण्यातील वन उद्यानाच्या विकासासाठी चार कोटी 65 लाखांचा निधी मंजूर

आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांना यश


मुक्ताईनगर (16 ऑक्टोबर 2024) : मुक्ताईनगर तालुक्यातील सातपुडा डोंगराच्या कुशीतील चारठाणा येथील श्री सिद्ध भवानी माता मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि मुक्ताईनगर बोदवड रस्त्यावरील वन हद्दीत निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या जागृत कालिंका माता मंदिर येथे पर्यटन वाढीस चालना मिळावी, भाविक भक्तांना सोयी0सुविधा उपलब्ध व्हाव्या व पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने विविध विकास कामे करण्यासाठी 155.20 लक्ष रुपये आणि माळेगाव वन उद्यान येथे विविध विकास कामे करण्यासाठी 310.40 लक्ष रुपये निधीला मंजुरी मिळाली आहे.

विविध कामे होणार
या निधी अंतर्गत वन उद्यानात विविध झाडे, फुलझाडे लॉन लावणे, रोज गार्डन निर्मिती, लहान मुलांसाठी विविध खेळाचे साहित्य बसवणे, आकर्षक प्रवेशद्वार निर्मिती, पाथ वे निर्मिती, कुंपण निर्मिती पेव्हर ब्लॉक बसवणे, तलावात जल पर्यटनासाठी बोट, तिकीट खिडकी, जीव रक्षक जॅकेट पुरवठा करणे, सिमेंट बाक, सोलर लाईट बसवणे, स्वच्छता गृहाची निर्मिती, मचाण निर्मिती, पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईन इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांचे स्विय सहाय्यक योगेश कोलते यांनी दिली.


कॉपी करू नका.