भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे 26 ते 28 दरम्यान मोफत महिला उद्योजक मेळावा
भुसावळ (16 ऑक्टोबर 2024) : भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे 26 ते 28 ऑक्टोबरदरम्यान मोफत महिला उद्योजक मेळाव्याचे शहरातील डेली मार्केट भागातील ब्राह्मण संघात आयोजन करण्यात आले आहे. महिला आर्थिकदृष्ट्यात स्वावलंबी व्हाव्यात, त्यांच्याकडील उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी व महिलांकडील घरगुती उत्पादनांचा अधिकाधिक लोकांपर्यंत प्रचार-प्रसार होण्यासाठी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या सहकार्यातून शहरात महिलाांसाठी मोफत उद्योजक मेळावा होत आहे.
शहरासह तालुक्यातील महिलांना आवाहन
शहर व तालुक्यातील अधिकाधिक महिलांनी मेळाव्यात सहभाग नोंदवण्यासाठी अनिता आंबेकर (7304434949), जयश्री चौधरी (9158823288), सोनल महाजन (9130838468), मनीषा काकडे, वैशाली सैतवाल, राजश्री बादशाह यांच्याशी संपर्क साधावा. मेळाव्यात महिलांना निशुल्क (मोफत) सहभाग देण्यात येणार असून जास्तीत-जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी केले आहे.

24 पर्यंत बुकींगची मदत
स्टॉल बुकींग करणार्या महिलांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, कोणते प्रोडक्ट ठेवणार याची माहिती संपर्क क्रमांकासह द्यावी तसेच आधारकार्ड पाहून फार्म भरण्यात येणार असून पासपोर्ट साईज फोटो आणावा व 24 ऑक्टोबरपर्यंत बुकींगसाठी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले आहे.




