वरणगावात मतदार याद्यांमध्ये घोळ : मुख्याधिकार्‍यांना घेराव


वरणगाव : पालिकेच्या होवू घातलेल्या निवडणुकीसाठी सोमवारी पालिकेने जारी केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर घोळ असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुख्याधिकार्‍यांना जाब विचारत घेराव घातला. पालिकेची मुदत पाच जूनला संपणार असल्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.प्रभाग रचना व प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली असून सोमवार, 16 मार्चला प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. या मतदार याद्यांमध्ये एका प्रभागात राहणार्‍या रहिवाशांची नावे दुसर्‍या प्रभागात गेल्याने प्रचंड प्रमाणावर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीचे सुधाकर जावळे, अरूणा इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष संतोष माळी व गावातील नागरीरकांनी व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांचेा कार्यालय गाठून याबाबत विचारणा केली तसेच विविध प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण होते.

हरकतींचा कालावधी वाढवून द्यावा
हरकती घेण्याचा कालावधी हा 19 मार्चपर्यंत असल्याने तो कमी असल्याने तो वाढवून मिळण्याची मागणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस आय व शिवसेना पक्षांनी केली आहे. मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी आपण यावर हरकती घ्या, प्रत्यक्ष हरकतदाराला सोबत घेऊन भेट देऊन पंचनामा केला जाईल व योग्य तो निर्णय घेतला जाईल, कुणावरही अन्याय होणार नाही ही तसेच ज्या प्रभागात मोठ्या प्रमाणात घोळ आहे अशा बीएलओ यांच्यावरती कारवाई करण्यात येईल व निवडणूक आयोगाकडून हरकती घेण्याचा कालावधी वाढवण्यासाठी मागणी केली जाईल, असे सांगितल्यानंतर जमाव शांत झाला.



राहतात एका प्रभागात त पाहिजे दुसर्‍या प्रभागात
प्रभाग रचनेमध्ये काही संभाव्य उमेदवारांची गैरसोय झाली आहे यामुळे दुसर्‍या प्रभागात जावून निवडणूक लढवायची असल्याने काही उमेदवार एका प्रभागात राहतात व दुसर्‍या प्रभागांमध्ये घर असल्याचे दाखवून मतदान बदलवण्याचा प्रयत्न करत आहे यामुळेदेखील घोळ निर्माण झाला आहे

सोयीसाठी मतदारांची फेरफार
काही उमेदवारांनी आपल्या हक्काचे मतदान व्हावे यासाठी दुसर्‍या प्रभागांमधील मतदार आपल्या प्रभागात नोंदवुन घेतल्याने मोठ्या प्रमाणावर त्या प्रभागातील मतदारांची संख्येत तफावत पडत आहे यामुळे प्रत्यक्ष भेटी घेऊन यादी दुरुस्त होणे गरजेचे आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !