भुसावळ विधानसभेची जागा काँग्रेसला सुटणार : आज उमेदवाराचे नाव नाव जाहीर होणार !


भुसावळ (25 ऑक्टोंबर 2024) : भुसावळ विधानसभेची जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला सुटणार यावरून खल सुरू असतानाच गुरुवारी ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येईल, असा दावा पदाधिकार्‍यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी काँग्रेस पदाधिकार्‍यांशी संवाद साधून मतदारसंघाचा आढावा घेतला व त्यानंतर महाविकास आघाडीतील इच्छूक सुमारे दहा उमेदवारांची बैठक महामार्गावरील एका हॉटेलात झाली व यावेळी उमेदवारी कुणाला देण्यात यावी यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, भुसावळच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असलातरी तब्बल 15 वर्षानंतरही जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे.

यांची होती बैठकीला उपस्थिती
या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जळगाव शहराध्यक्ष श्याम तायडे, एआयसीसी सचिव प्रजापती, भुसावळ प्रभारी मोहम्मद हारूण नकवी, निरीक्षक जगदीश पाटील आदींची उपस्थिती होती. दरम्यान, काँग्रेसकडून प्रीती तोरण महाजन व डॉ.राजेश मानवतकर, अ‍ॅड.प्रवीण सुरवाडे आदी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !