भुसावळात आमदार संजय सावकारे 28 रोजी शक्ती प्रदर्शनानंतर भरणार अर्ज

जिल्ह्यातील मंत्र्यांसह नेत्यांची उपस्थिती : दर्डा भवनापासून निघणार रॅली


Bhusawalat MLA Sanjay Savkare will fill the application after the power show on 28th भुसावळ (26 ऑक्टोबर 2024) : भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना पुन्हा चौथ्यांदा संधी दिली आहे. सलग 15 वर्ष आमदार असलेले सावकारे पुन्हा मतदारांकडे चौथ्यांदा विजयासाठी मतांचा आशीर्वाद मागण्यासाठी जाणार आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठे चैतन्याचे वातावरण आहे. सोमवार, 28 रोजी आमदार संजय सावकारे हे हजारो कार्यकर्त्यांसह नेत्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

दर्डा भवनापासून निघणार
आमदार संजय सावकारे हे जिल्ह्यातील मंत्री व स्थानिक व ग्रामीण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढणार आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता रॅलीला सुरूवात होणार असून शहरातील जामनेर रोड, बाजारपेठ पोलीस ठाणे, लोखंडी पूल, गांधी पुतळा मार्गे ही शक्ती प्रदर्शन रॅली प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.


जिल्ह्यातील मंत्री व खासदारांची उपस्थिती
शक्ती प्रदर्शन रॅलीत मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष समाधान महाजन यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. अधिकाधिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भाजपातर्फे करण्यात आले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !