भुसावळातील विघ्नहर्ता पब्लिकेशनने केली 60 हॉकर्स बांधवांची दिवाळी गोड

हॉकर्स बांधवांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य : आठ वर्षांपासून अव्याहत उपक्रम


Vighnaharta Publication in Bhusawla made 60 hawkers brothers a sweet Diwali भुसावळ (27 ऑक्टोबर 2024) : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिल्या जाणार्‍या वृत्तपत्राला ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता व अनेक अडचणी आल्यानंतरही न चुकला भल्या पहाटे चोखंदळ वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचणार्‍या भुसावळ शहरातील वृत्तपत्र हॉकर्स बांधवांची दिवाळी विघ्नहर्ता पब्लिकेशनने गोड केली आहे. रविवार, 27 ऑक्टोबर रोजी विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी यांनी 60 हॉकर्स बांधवांना साडी, ड्रेस व मिठाईचे वाटप केले. गेल्या सात वर्षांपासून विघ्नहर्ता पब्लिकेशनच्या माध्यमातून हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाने हॉकर्सही भारावले आहेत.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
दिव्य मराठीचे निवासी संपादक दीपक पटवे, युनिट हेड संजीव पाटील, राज्याचे वितरण विभाग प्रमुख प्रदीप पांडे, वितरण विभाग प्रमुख कैलास लोहार, दिव्य मराठी भुसावळचे ब्युरो चीफ हेमंत जोशी, रिपोर्टर श्रीकांत सराफ, जाहिरात विभागाचे सहकारी संजय ठाकूर, वितरण विभागाचे नितीन पाखले, विघ्नहर्ता पब्लिकेशन्सचे संचालक रवी निमाणी, देवेंद्र निमाणी, जय निमाणी, पत्रकार गणेश वाघ, धनश्री जाधव, बबलू ठाकूर, भालचंद्र भारंबे यांच्यासह हॉकर्स बांधव उपस्थित होते.

वाचकांपर्यंत अंक पोहोचवण्यात हॉकर्सची भूमिका मोलाची
प्रतिकुल परीस्थितीत आपल्या संसाराचा रहाटगाडा ओढणार्‍या हॉकर्स बांधवांप्रती भुसावळातील विघ्नहर्ता पब्लिकेशन्सचे संचालक रवींद्र निमाणी यांनी नेहमीच संवेदना जोपासली आहे. अडी-अडचणीत ते त्यांच्या नेहमीच धावून येतात. रविवारी 60 बांधवांना साडी, पँट शर्ट कापड, नमकीन व मिठाईचा बॉक्स देवून त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

दिवाळी गोड व्हावी हाच उद्देश : रवींद्र निमाणी
तीनही ऋतुंमध्ये भल्या पहाटे समाजापर्यंत वृत्तपत्र पोहोचण्याचे काम हॉकर्स व वृत्तपत्र विक्रेते बांधव करतात व त्यांची दिवाळी गोड व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश असून सतग आठव्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात आला व यापुढेही राबवत राहू, असे विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी म्हणाले. डिजिटल युगात वृत्तपत्राचे महत्व आजही अबाधीत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य अंग असलेल्या वृत्तपत्राला पहाटेच वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्र हॉकर्स बांधवांचे योगदान मोठे असल्याचेही त्यांनी नमूद केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !