भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात नॅकची बी.ग्रेड प्राप्त
भुसावळ (2 नोव्हेंबर 2024) : भुसावळ शहरातील कोटेचा महिला महाविद्यालयास बेंगलोर येथील नॅक समितीने नुकतीच भेट दिली. त्यांच्याकडून झालेल्या परिक्षणातून महाविद्यालयास नॅकची बी ग्रेड प्राप्त झाली. शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात चौथ्या सायकलच्या पुनर्मूल्यांकनासाठी 22 आणि 23 ऑक्टोबरला बेंगलोर येथील नॅक समितीने भेट दिली होती.
एनएएसीकडून झालेल्या ऑनलाईन व ऑफ लाईन परिक्षणातून आपल्या महाविद्यालयास 2.19 सीजीपीए मिळाला आहे. बी ग्रेड प्राप्त झाली आहे. यासाठी कोऑर्डिनेटर डॉ.जे.व्ही.धनवीज, उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर, उपप्राचार्य डॉ.शरद अग्रवाल तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.





