एरंडोल शहरात बळीराजा महोत्सव : शोभायात्रेने वेधले लक्ष
अमोल देवरे
एरंडोल (3 नोव्हेंबर 2024) : बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचे स्मरण करण्याचा सण. भारतीय संस्कृतीत बळीराजा न्यायी, दानशूर, सद्गुणी म्हणून विख्यात आहे. बळीचे राज्य अर्थात समतेचे, न्यायाचे राज्य. बळीचे राज्य म्हणजे स्त्रीपुरुष विषमता, जातीभेद, वर्णभेद रहित राज्य. अशा महादानशूर, संविभागी बळीराजाची आठवण दिवाळीला- बलिप्रतिपदेला बळीराजाचे वारस, शेतकरी आयाबहिणी करतात. या सणाचे औचित्य साधून शहरातून 2 रोजी शोभायात्रा काढण्यात आली व या शोभायात्रेने शहरवासीयांच्या डोळ्याचे पारणे फेडले.


शहरातील भागातून शोभायात्रा
सजवलेल्या बैलगाडीतून बळीराजाची विशाल प्रतिमा ठेवून शहरातील विविध भागातून शोभायात्रा काढण्यात आली. महात्मा जोतिबा फुले पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मारवाडी गल्ली, अमळनेर दरवाजा, नागोबा मढी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक शोभायात्रा समारोप करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
देविदास महाजन, विजय आण्णा महाजन, दशरथ महाजन, शेतकरी बांधव तसेच विविध प्रवर्गातील समाजबांधव यावेळी उपस्थित होते. आयोजन सत्यशोधक समाज संघ एरंडोल तसेच शिवदास महाजन, हिलाल महाजन, कविराज पाटील, खुशाल महाजन, अनिल महाजन, सचिन महाजन, हिंमत महाजन, मनोज महाजन, हेमंत महाजन, कमलेश महाजन, समाधान महाजन, विश्वनाथ महाजन, दीपक महाजन, दिनेश महाजन, रघुनाथ महाजन, राजेंद्र महाजन मोहन, महाजन आदींनी केले.
सत्यशोधक समाज संघ,एरंडोल,




