भुसावळ ते कचनेर पदयात्रा उद्या रवाना होणार
भुसावळ (4 नोव्हेंबर 2024) : भुसावळहून कचनेरसाठी मंगळवार, 5 रोजी पहाटे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानंतर पदयात्रा रवाना होणार आहे. यावेळी सर्वप्रथम भगवंतांचा अभिषेक व पूजा, आरती, प्रार्थना, ध्वजारोहण, वृक्षारोपण, यात्रा आशीर्वाद एवं मांगलिक श्रवण पूर्ण केल्यानंतर पदयात्रेला सुरूवात होणार आहे.
मंगळवारी सकाळी 6.40 वाजता दिगंबर जैन मंदिर आठवडे बाजारापासून पदयात्रेला सुरूवात होईल व ती चोरवड-जामनेर-अजंठा-सिल्लोड-फुलंब्री- सावंगी फाटा मार्गे श्री चिंतामणी 1008 पार्श्वनाथ भगवान, कचनेर येथे सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दाखल होवून पदयात्रेचा समारोप होईल. पदयात्रेत आपले नाव नोंदणी करण्याकरिता भुसावळ नोंदणी व संपर्क प्रमुख रुपेश गोधा, विकास गोधा, जय दोशी, गजेंद्र रुईकर व चेतन जैन हेमावत यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन पदयात्रेचे प्रायोजक, कासलीवाल परिवार, गोधा परिवार व डोशी परिवार, भुसावळ यांनी केले आहे.

सर्व सकल जैन समाज बांधवांनी, जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून पदयात्रेकरूना आशीर्वाद, शुभेच्छा व अनुमोदना देण्याकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन सकल जैन समाज, दि.जैन युवा मंच,जैन युवा ग्रुप, राष्ट्रीय जैन सेना भुसावळ यांनी केले आहे.
