भाऊबीजेनिमित्त ज्ञानदाकडची साडी-चोळी संत मुक्ताईने केली परीधान


Gnanadakad’s saree bodice was worn by Muktai on the occasion of brother-in-law मुक्ताईनगर (4 नोव्हेंबर 2024) : बहिण-भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजेच भाऊबीज. हा कार्तिक द्वितिया (यमद्वितीया) हा दिवाळीतला चौथा दिवस हिंदूधर्मीय साजरा करीत असलेला एक महत्वपूर्ण सण आहे. हिंदीत याला भाईदुज म्हणतात. दीपावली पर्वातील भाऊबीज सणानिमित्त श्रीमंत संत ज्ञानीयांचे राजे लडिवाळ बंधू माऊली ज्ञानेश्वर महाराज आळंदी संस्थानकडून आलेली साडीचोळी बहिण आदिशक्ती संत मुक्ताईला जूनी कोथळी समाधीस्थळ येथे विधीवत पूजा करून परिधान करण्यात आली.

विश्वस्तांच्या हस्ते विधीवत पूजा
नवीन मंदिरात आपेगाव येथून म्हणजेच आई साहेब मुक्ताई साहेबांच्या जन्मस्थानावरून विश्वस्त मंडळी आली होती. त्यांच्याहस्ते विधीवत पूजा करून संत मुक्ताईला साडी-चोळी परिधान करण्यात आली. भाऊबिजेला भाऊ बहिणीकडे जावून ओवाळण्याची परंपरा टिकून आहे. तीच परंपरा पुढे नेत श्री संत मुक्ताई संस्थान कोथळी- मुक्ताईनगरला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्याकडून आषाढी वारीत माऊली व मुक्ताई यांचे ह्रदगत भेटीनंतर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान अध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्याहस्ते दिलेली साडीचोळी भाऊबीजेच्या पर्वावर संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी पहाटेच्या काकडा आरती भजन व मंत्रोपचार अभिषेक पूजन करून विधीवत नेसवली. पौरोहित्य विनायक व्यवहारे, दीपक कुरमभट्टी, हभप.रवींद्र महाराज हरणे यांनी केले.


विधीवत पूजेनंतर नेसवली मुक्ताईस साडी
या पवित्र सणाने बहिण-भावाचे नाते जपत आई साहेबांचे जन्मस्थळ आपेगाव येथून श्री.संत ज्ञानेश्वर माऊलींच्यावतीने नवीन ,समाधी स्थळ कोथळी श्रीक्षेत्र संत मुक्ताईनगर तसेच मेहून मंदिर आदी ठिकाणी संत मुक्ताबाईला दिवाळी व भाऊबीजेची भेट म्हणून साडी, चोळी भेट देण्यात आली. ही साडी चोळी रविवारी भाऊबीजेच्या मुहूतर्रावर रविवार, 3 नोव्हेंबर रोजी विधीवत पूजा करीत आदिशक्ती मुक्ताबाईस नेसविण्यात आली.

यांची होती उपस्थिती
आपेगाव संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आपेगावकर, भागवत पाटील यांच्यासह आपेगाव येथील इतर मंडळी तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या प्रियंका सुरज पाटील, संजना चंद्रकांत पाटील, सूर्यकांत काळे, सावंत, नारायण घुगे, कैवल्य सावंत, गलधर महाराज, बालाजी मिसाळ, संत मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज, पंकज महाराज, रतीराम महाराज खामखेडा, कीर्तनकार दुर्गा संतोष मराठे, मराठा सेवा संघ वसतीगृह कक्ष राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कदम, पुरुषोत्तम वंजारी, ज्ञानेश्वर हरणे, राम जुनारे, सुरेश भोलाणे, संतोष मिस्तरी, रमेश पाटील, गोपाळ चौधरी, शंकर बोराखेडे यांच्यासह संताजी नगर व शिवरायनगर येथील महिला भगिनी तसेच इतर असंख्य भाविकभक्त उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !