रावेर विधानसभा मतदारसंघात नऊ उमेदवार रिंगणात


Nine candidates in the Raver Assembly constituency रावेर (4 नोव्हेंबर 2024) : रावेर विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यानंतर आता निवडणूक रिंगणात नऊ उमेदवार राहिल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारांच्या माघारीनंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हाचे वाटप निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी जाहीर केले. यावेळी तहसीलदार बी.ए.कापसे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची उपस्थिती होती.

असे आहे रिंगणातील उमेदवार
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. अंतिम उमेदवारांची यादी यावेळी जाहीर करण्यात आली व चिन्हाचे वाटप उमेदवारांच्या व त्यांच्या प्रतिनिधिच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले. निवडणूक रिंगणात आता धनंजय शिरीष चौधरी (काँग्रेस), अमोल हरिभाऊ जावळे (भाजप), दारा मोहंम्मद जाफर मोहम्मद (अपक्ष), अनिल छबीलदास चौधरी (प्रहार), नारायण हिरामण अडकमोल (बसपा), आरीफ शेख (अपक्ष), मुस्ताक कमाल मुल्ला (अपक्ष), शमिभा भानुदास पाटील (वंचित बहुजन आघाडी ) खाल्लोबाई युनूस तडवी (ऑल इंडिया हिंदुस्थान पार्टी) यांचा समावेश आहे.


अखेरच्या दिवशी यांची माघार
मंगळवारी सुरेश गुलाब बोदडे, उमा विठ्ठल भील, संजय अर्जुन चौधरी, नुरा तडवी, धीरज अनिल चौधरी, नंदिनी अनिल चौधरी, अबाज फकिरा तडवी, वामनराव भालचंद्र जडे, गंगाराम महेंद्र बार्‍हे, डी.डी.वाणी, शफीखान मुस्तफा तडवी, शेख कुर्बान शेख करीम, संजय हमीद तडवी, हर्षा अनिल चौधरी आदींनी माघार घेतली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !