मुक्ताईनगर विधानसभेसाठी 17 उमेदवार रिंगणात ; सात उमेदवारांची माघार

चंद्रकात पाटील व रोहिणी खडसे नावाचे तीन उमेदवार


मुक्ताईनगर (5 नोव्हेंबर 2024) : मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत सोमवारी सात उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता 17 उमेदवार रिंगणात आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची प्रक्रिया झाल्यानंतर सायंकाळी 17 उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.

या उमेदवारांनी घेतली माघार
जितेंद्र पांडुरंग पाटील (रा.भालोद, ता.यावल), सुरेश शिवराम ठाकरे (रा.थोरगव्हाण, ता.रावेर), संजय प्रल्हाद कांडेलकर (रा.मुक्ताईनगर), प्रतिभा संजय कांडेलकर (रा.मुक्ताईनगर), रवींद्र एकनाथ बावस्कर (रा.कोल्हाडी, ता.बोदवड), सागर प्रभाकर पाटील (रा.बोदवड), सुरयाबानो दगडू शाहा (रा.सावदा, ता.रावेर).


17 उमेदवार निवडणूक रिंगणात
रिंगणातील उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अ‍ॅड.रोहिणी खडसे, शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत निंबा पाटील, बसपाचे अनिल गंभीर मोरे, मनसेचे अनिल बाबूराव गंगतीरे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) अशोक बाबूराव जाधव, वंचित बहुजन आघाडीचे संजय पंडित ब्राह्मणे, अपक्ष अर्जुन तुळशीराम पाटील, अपक्ष ईश्वर भागवत सपकाळ, अपक्ष उमाकांत आत्माराम मराठे, अपक्ष रोहिणी कवळे, अपक्ष रोहिणी खडसे, अपक्ष रोहिणीताई खडसे, अपक्ष बेबी वाकर, अपक्ष चंद्रकांतभाऊ पाटील, अपक्ष चंद्रकांत पाटील, अपक्ष जफर अली मकसूद अली, विनोद नामदेव सोनवणे, अपक्ष सुरेश रुपा तायडे यांचा समावेश आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !