ऑलम्पिक विश्वविजेत्या एमसी मेरी कॉम यांच्या मिरवणूकीने वेधले भुसावळकरांचे लक्ष

भुसावळला ऑल इंडीया बॉक्सिंग अ‍ॅकेडमी टूर्नामेंटमध्ये 304 महिला खेळाडूंचा सहभाग


भुसावळ (7 नोव्हेंबर 2024) : शहरातील कोरोनेशन क्लबमध्ये आई फाऊंडेशन अंतर्गत छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी आयोजीत राणी लक्ष्मीबाई पहिलीच मुली व महिलांसाठी ऑल इंडीया बॉक्सिंग टूर्नामेंटचे आयोजन 6 ते 10 नोव्हेंबर या काळात करण्यात आले आहे. या टूर्नामेंटसाठी देशभरातील 304 महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. ा टूर्नामेंटला विशेष उपस्थिती म्हणून सहा वेळेस विश्वविजेती, ऑलम्पिक विजेत्या ठरलेल्या एम.सी. मेरी कॉम या बुधवारी शहरात दाखल झाल्यानंतर त्यांची जल्लोषात मिरवणूक काढली होती.

मेरी कॉम यांना पाहण्यासाठी गर्दी
शहरात प्रथमच महिला, मुलींसाठी ऑल इंडिया बॉक्सिंग टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या टूर्नामेंटसाठी देशभरातील महिला, मुली यांनी सहभाग नोदविला आहे. या टूर्नामेंटसाठी विशेष उपस्थिती म्हणून सहा वेळेस विश्वविजेती, ऑलम्पिक विजेत्या ठरलेल्या एम.सी. मेरी कॉम यांची बुधवारी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिरापासून मेनरोडने त्यांची कोरोनेशन क्लबपर्यत वाजत-गाजत मिरवणूक सकाळी 11 वाजता काढण्यात आली. यावेळी या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणावर खेळाडूंनी सहभाग घेतला. अनेक खेळाडूंनी या विश्वविजेता एमसी मेरी कॉम यांचे मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.
कोरोनेशन क्लबमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त सहा खेळाडूंना सत्कार एमसी मेरी कॉम यांच्याहस्ते करण्यात आला. गेल्यावर्षी 2023 डिसेंबरमध्ये हरियाणा येथे याच पध्दतीने टूर्नामेंटचे आयोजन केल्याची माहिती महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महाराष्ट्राचे महासचिव डॉ.राकेश तिवारी यांनी दिली.


दोन तास चालली मिरवणूक
अष्टभुजा देवीच्या मंदिरापासून मिरवणूकीला सुरूवात झाली होती. ही मिरवणूक जामनेर रोडमार्गे पांडुरंग टॉकीज, बाजारपेठ पोलीस ठाण्यासमाोरून हंबर्डीकर चौक, शहर पोलीस ठाण्यावरून गांधी पुतळ्याजवळून कोरोनेशन क्लबवर पोहोचली. मिरवणूकीमुळे जामनेर रोडवरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता.

20 जिल्ह्यातील खेळाडूंची उपस्थिती
शहरात होत असलेल्या बॉक्सिंग टूर्नामेंटमध्ये सहभाग घेण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली, आध्रप्रदेश, तेलंगणा, गुजराथ, पंजाब, हरियाणासह महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील महिला खेळाडू येथे आले आहे.

मेरी कॉम यांच्याहस्ते उद्घाटन
कोरोनेशन क्लबमध्ये ऑलम्पिक विश्वविजेत्या एम.सी. मेरी कॉम यांच्याहस्ते टूर्नामेंटचे उद्घाटन करण्यात आले. महिलांनी सुध्दा खेळात मागे न राहाता, स्पर्धेत सहभाग घेत जावा, पुरूषांनी सुध्दा त्यांना प्रोत्साहन द्यावे, जेणे करून ऑल इंडीया स्तरावर खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. यासाठी महिलांनी मागे न राहता विविध ठिकाणी हाोत असलेल्या टूर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवावा आणि आपल्यासह आपल्या शहराचे नाव उज्वल करावे, असे आवाहन एमसीमेरी कॉम यांनी केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !