रावेर तालुक्यात महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांचे उत्स्फूर्त स्वागत
महायुतीच्या कल्याणकारी योजनांबाबत जनतेच्या मनात विश्वास
रावेर (7 नोव्हेबर 2024) : रावेर विधानसभा निवडणुकीतल महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी गुरुवारी रावेर तालुक्यातील संवाद दौर्यात पुनखेडा, पातोंडी, निंभोरासीम, धुरखेडा, थेरोळा, बोहर्डे, खिरवड, नेहते, दोधे, अटवाडे, मोरगाव बु, मोरगाव खुर्द या गावांना भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. महायुती सरकारने घेतलेल्या सर्वसमावेशक आणि लोककल्याणकारी निर्णयांबद्दल जनतेत असलेला विश्वास, नागरिकांच्या उत्साही आणि आनंदी प्रतिसादातून स्पष्टपणे दिसून आला.


आबाल-वृद्धांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
युवक, ज्येष्ठ नागरिक, आणि महिलांकडील मोठ्या उत्साहात अमोल जावळे यांचे स्वागत केले जात आहे. घरोघरी कमळ हे मिशन महायुतीचे कार्यकर्ते प्रभावीपणे राबवित असून अमोल जावळे यांचा थेट जनतेशी संवद होत असल्याने प्रत्येक गावात त्यांनी आपला ठसा सोडला आहे, ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद व युवा मंडळींचे पाठबळ मिळत आहे. त्यांच्या कार्यप्रणालीमुळे गावागावात जनतेचा उत्साह वाढला असून त्यांच्या विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
यांचा प्रचार दौर्यात सहभाग
दौर्यात सुरेश धनके, प्रल्हाद पाटील, समाधान पाटील, वाय.व्ही.पाटील, हरलाल कोळी, प्रवीण पंडित पाटील, राजन लासुरकर (खिरवळ), दुर्गादास पाटील, संजय पाटील, विजय महाजन, जितू पाटील, गोपाळ नेमाडे, खेबू पाटील, संजय पाटील, चंदू पाटील, महेंद्र पाटील, चेतन पाटील (अध्यक्ष युवा मोर्चा), आशाताई सपकाळे (अध्यक्ष महिला मोर्चा), स्वातीताई भंगाळे, राजू पाचपोळे, सुनील पाटील, सिकंदर तडवी यांच्यासह भाजप महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते, तरुण मित्र आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




