त्यागमूर्ती राजेंद्र दायमा प्रतिष्ठानतर्फे 11 मुलांची दिवाळी गोड
भुसावळ (11 नोव्हेंबर 2024) : प्रकाश पर्वाचा व आनंदाचा सण असलेल्या दिवाळीत आपल्या आनंदात इतरांनाही सामील करून घेणे, समाजातील दारिद्य्र, अंधार आणि दुःख यांना दूर करून नवीन आशेचा, आनंदाचा आपण पसरवण्याच्या उद्देशातून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या भुसावळातील त्यागमूर्ती राजेंद्र दायमा प्रतिष्ठानतर्फे 11 मुलांची दिवाळी गोड करण्यात आली.
या मुलांना नवीन कपड़े, फराळ व फटाक्यांचे वाटप डॉ.मधुसूदन इंगले (पीएच.डी. सोलर फिजिक्स) व अॅड.हरेष पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अॅड.निर्मल दायमा, नेहा निर्मल दायमा, दीपक टेकवानी उपस्थित होते.

