चिंचोलीत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा : 27 वर्षानंतर वर्गमित्र आले एकत्र


यावल (11 नोव्हेंबर 2024) : यावल तालुक्यातील चिंचोली येथील सार्वजनिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा वर्ग पुन्हा 27 वर्षानंतर भरला. 1996-97 मध्ये इयत्ता 12 वीतील विद्यार्थी पुन्हा एकत्र आले व स्नेहमेळावा घेतल्यानंतर त्यात जुन्या शालेेय आठवणींना उजाळा देण्यत आला. यावेळी गुरूजनांचे ऋण व्यक्त करीत त्यांचा सन्मान करण्यात आला.

शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त
चिंचोली, ता.यावल येथील सार्वजनिक विद्यालय शाळेत 27 वर्षानंतर सन 1996-97 या वर्षीच्या इयत्ता बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला. गुरुवारी पार पडलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक व्ही.एस.पाटील होते. माजी मुख्याध्यापक एम.एच.पाटील, एन.आर.पाटील, जे.एस.पाटील, एकनाथ पाटील आणि सध्याचे प्राचार्य के.एस.पाटील यांची उपस्थिती होती. आपल्या शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी गुरूजनांचे आभार व्यक्त करीत त्यांना सन्मानीत केले. सूत्रसंचालन प्रा.मिलिंद बडगुजर, प्रा.प्रमोद जाधव, निशा पाटील यांनी केले. दीपक मिस्तरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रीत आणून हा सुवर्णयोग घडवून आणण्याचे महत्तम कार्य केले. यावेळेस अनेक विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना भावूक झाले. शिक्षक मनोगत मध्ये एम.एच.पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपले विद्यार्थी आपल्यापेक्षा पुढे गेल्याचे समाधान व्यक्त केले. प्रा.मिलिंद बडगुजर यांच्या शेरो शायरीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाच्या शेवटी अनेकांनी आपल्या विविध नकला, कला सादर केल्या यावेळेस विद्यार्थ्यांनी शाळेला सरस्वतीची मूर्ती भेट दिली आणि भावी काळामध्ये दरवर्षी दहा गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.


यांची स्नेहमेळाव्याला उपस्थिती
मेळाव्यास डॉ.मंगला पाटील, सोनिया पाटील, राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक मज्जित तडवी, विजय साळुंके, पोलीस सलीम तडवी, चिंचोली गावाचे पोलीस पाटील राकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप साळुंके सह आडगाव, किनगाव, चिंचोली गावातील माजी विद्यार्थी उपस्थित होते.

स्नेह मेळाव्यात 50 विद्यार्थी उपस्थित
कार्यक्रमास शाळेत शिक्षण घेत सद्या विविध ठिकाणी नोकरीला असलेले माजी विद्यार्थी हे गुजरात राज्यातील सुरत, नंदुरबार, धुळे, मुंबई, पुणे, नाशिक अशा सर्व ठिकाणाहून उपस्थित राहिले. 550 विद्यार्थी या कार्यक्रमात एकत्र आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !