अट्टल दुचाकी चोरटा जाळ्यात : भुसावळ बाजारपेठसह तीन ठाण्यातील गुन्हे उघडकीस


जळगाव (1 डिसेंबर 2024) : जळगाव शहरातून दुचाकी चोरुन तिची विल्हेवाट लावणार्‍या अट्टल गुन्हेगाराच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या. या कारवाईतून शहर, जिल्हापेठ तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे तीन गुन्हे उघडकीस आले.संशयितांकडून चार दुचाकी पथकाने हस्तगत केल्या.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे. ही चोरीची दुचाकी गोपाल तेली (42, रा.कळमसरा, ता.पाचोरा) हा वापरत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार पथकाने कळमसरा येथे जावून त्याला ताब्यात घेतले. विश्वासात घेत त्याची विचारपूस केली असता त्याने साथीदाराला सोबत घेत जळगाव जिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने त्याच्याकडुन सुमारे एक लाख 30 हजाराच्या चार दुचाकी हस्तगत केल्या. संशयिताला पुढील तपास कामी जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गजानन देशमुख, विनोद पाटील, विष्णु बिर्‍हाडे, ईश्वर पाटील, राहुल महाजन यांच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !