औषध खरेदीच्या बहाण्याने जळगावच्या व्यावसायीकाला सहा लाखांचा गंडा


जळगाव (1 डिसेंबर 2024) : ग्रेस अकॅडमी मिलीटरी डिपार्टमेंट येथे औषधांची आवश्यकता आहे त्यानंतर औषधीची यादी व्हाटसप टाकली. पेमेंट अदा करण्यासाठी फोनपे अ‍ॅपमधील इंटर क्रेडिट कार्डचा तपशील घेत सायबर भामट्याने औषधी विक्रेत्याच्या बँक खात्यामधून सहा लाख सात हजार सातशे रुपये ऑनलाइन काढुन फसवणूक केली. या प्रकरणी शुक्रवार, 29 रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

50 वर्षीय गृहस्थ हे व्यावसायीक असून त्यांचे मेडीकल दुकान आहे..सोमवार, 23 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला. मी चाळीसगाव ग्रेस अकॅडमी मिलीटरी डिपार्टमेंट येथुन बोलत आहे. आमच्या डिपार्टमेंटला औषधांची आवश्यकता आहे. मी आपल्याला व्हाट्सपवर औषधांची यादी पाठवितो. त्यानुसार आम्हाला औषधी पाठवा, असे म्हणाला.
सायबर ठगाने तत्काळ व्यावसायीकाच्या व्हाट्सप क्रमाकांवर औषधांची यादी पाठविली. फोन पेव्द्ारे दहा रुपये पाठवा, असे त्याने सांगितले. व्यावसायिकाने दहा रुपये पाठविले असता ठगाने फोनपेव्दारे व्यावसायीकाला 20 रुपये पाठविले.

काही अवधीनंतर व्यावसायिकाच्या मुलाशी सायबर ठगाने संपर्क साधला. मोबाइलमधील फोनपे अ‍ॅपमधील इंटर क्रेडीट कार्ड डिटेलसमध्ये त्याचे क्रेडीट कार्डचा तपशील, फेडरल बँक व रक्कम एक लाख 39 हजार 480 असा तपशील टाकण्यास सांगुन व्यावसायिकाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर व्यावसायीकाच्या बँक खात्यामधून सहा लाख सात हजार सातशे रुपये काढुन आर्थिक फसवणूक केली.

पैसे तर आले नाहीच मात्र बॅक खात्यातील रक्कम परस्पर वळविल्याच्या प्रकाराने व्यावसायीक चक्रावले. त्यांनी संबधित मोबाईल क्रमांकावर फोन केला असता रिसीव्ह करण्यात आला नाही अथवा कोणताही प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात जावून आपबिती कथन केली. या प्रकरणी सबंधित मोबाईल धारक सायबर ठगाविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !