जळगावातील प्रौढाचा दुचाकी अपघातात मृत्यू


जळगाव (1 डिसेंबर 2024) : अपघातातील जखमी अशोक शिंदे (वय 43) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवार, 30 रोजी त्यांची अचानक प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अशोक जगन्नाथ शिंदे हे सबजेलच्या पाठीमागे लक्ष्मीनगरात वास्तव्यास होते. शिंदे दुचाकीवरून शहरात जात असताना 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.20 वाजेच्या सुमारास अपघात होऊन ते जखमी झाले होते. त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलविले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवारी त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. उपचाराला प्रतिसाद न देऊ शकल्याने त्यांचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून ही खबर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार पो.हे.कॉ. महेंद्र पाटील यांनी रुग्णालयात पंचनामा करून जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली. विच्छदेन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास जिल्हापेठच्या सुवर्णा तायडे या करीत आहेत.1


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !