बोहरा समाज संघटनेच्या पदाधिकार्यांकडून आमदार अमोल जावळे यांचा सहृदय सत्कार
यावल (2 डिसेंबर 2024) : यावल शहरातील बोहरा समाज बांधवांनी भालोद येथे जाऊन नवनियुक्त आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांची भेट घेतली. बोहरा समाज संघटनेकडून त्यांना शाल, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. भेटी प्रसंगी अमोल जावळे यांनी या संपूर्ण बोहरा समाज बांधवांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी यावल तालुका बोहरा समाजाचे अध्यक्ष शब्बीर हुसेन, शफाकत हुसेन, इसाक अली, कादर अली, हुसेन अली, हसन अली सह आदींची उपस्थिती होते.