दहिगावातील चोरटा चोरीच्या 11 दुचाकींसह जाळ्यात
Thief from Dahigaon caught with 11 stolen bikes यावल (6 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील दहिगावातील 37 वर्षीय चोरट्याकडून चोरी केलेल्या तब्बल 11 दुचाकी शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आसीफ बशीर पटेल (37, रा.दहिगाव, ता.यावल) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल तालुक्यातील दहिगावातील पटेल वाड्यातील आसीफ बशीर पटेल यास 4 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने जळगाव शहरातून तब्बल 11 दुचाकी चोरीची माहिती समोर आली. आरोपीने अल्प किंमतीत या दुचाकींची विक्री केल्यानंतर संशयीताने दिलेल्या माहितीवरून 4 डिसेंबर रोजी सहा तर 5 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.

15 हजारात विक्री केल्या दुचाकी
आरोपी आसीफने गेल्या सहा महिन्यांपासून मोटारसायकली जळगाव भागातून चोरून दहिगाव व सावखेडासीम व ग्रामीण भागात विक्री करण्याचा सपाटा लावला. चांगल्या परिस्थितीत असलेली मोटार सायकल 8 ते 10 हजार जास्तीत जास्त 15 हजारापर्यंत विक्री होत असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. जळगाव शहर पोलीस ठाण्याचे फौजदार राजू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील, उमेश भांडारकर, राहुल पांचाळ, अमोल ठाकूर तपास करीत आहेत.

