चोपडा तालुक्यात गर्भवतीची आत्महत्या ; 47 वर्षीय प्रौढाविरोधात गुन्हा


चोपडा (6 डिसेंबर 2024)  : चोपडा तालुक्यातील एका गावात महिलेवर सुमारे वर्षभरापासून अत्याचार केल्यानंतर पीडीता गर्भवली राहिली मात्र संशयीतांने तिची जबाबदारी न स्वीकारल्याने पीडितीने जीवनयात्रा संपवली होती. याप्रकरणी पीडीतेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून शिवदास रायसिंग पावरा (47, ता. चोपडा) याच्याविरुद्ध बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे प्रकरण
शिवदास पावरा याने पीडित महिलेस आपल्या शेतात कामाला नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला महिला सात ते आठ महिन्यांची गर्भवती राहिली असता तिची जबाबदारी न घेता गाव सोडून संशयीत निघून गेला. त्यामुळे पीडित महिलेने आत्महत्या केली. मयत महिलेच्या भावाने पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !