महसुल कर्मचार्‍यांसोबत हुज्जत ; वाळू माफियांविरोधात गुन्हा

वाळुचे ट्रॅक्टर पळवून नेणे सात जणांना पडले महागात


धरणगाव (6 डिसेंबर 2024) : महसूल कर्मचार्‍यांसोबत हुज्जत घालत वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी सात वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आव्हाणी, ता. धरणगाव शिवारात मंगळवारी घडली होती .

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
महसुल विभागाच्या धरणगाव तालुक्यातील सोनवद विभागाचे मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर हे मंगळवारी आपल्या पथकासोबत आव्हाणी ते बांभोरी प्र. असे गस्तीवर होते. त्यावेळी आव्हाणी शिवारातील गिरणा नदी पात्रात अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना आढळून आले. यामुळे मंडळाधिकारी बाविस्कर यांच्यासह त्यांच्या पथकासोबत वाळु माफियांनी हुज्जत घातली. यानंतर महसूलच्या पथकाने गावातील सरपंच जानकीराम दामोदर पाटील आणि आव्हाणीचे पोलिस पाटील यांना घटनास्थळी बोलवले. परंतु तरी देखील वाळू माफिया ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अक्षय पाटील, उज्ज्वल पाटील, गणपत नन्नवरे, सोनू नन्नवरे, विशाल सपकाळे, किरण राजपूत आणि नाना पाटील यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !