भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेने टाकळीतील दुचाकीस्वाराचा मृत्यू


जळगाव (7 डिसेंबर 2024) : दुचाकीची दुरूस्ती करून घरी परतत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी 5 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनील गोवर्धन राठाडे (35, रा.टाकळी, ता.मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे.

दुचाकी दुरुस्ती करून परतताना अपघात
मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी गावात सुनिल राठोड हा तरूण आपल्या आई-वडील, पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला होता. मजूरी व खासगी वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करत होता. गुरुवार, 5 डिसेंबर रोजी सुनील राठोड हा त्यांची दुचाकी दुरूस्ती करण्यासाठी मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर येथे गेलेला होता. दुचाकीची दुरूस्ती करून तो रात्री 8.30 वाजता घरी परतत असतांना पुर्णाड फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुनिल हा गंभीर जखमी झाला. त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणाच्या पश्चात आई उखीबाई, पत्नी रंजना, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !