जळगावात मनपाची मोठी कारवाई : विना परवानगी बॅनर लावणार्‍या सहा जणांविरोधात गुन्हा


जळगाव (7 डिसेंबर 2024) : महापालिकेने विना परवानगी बॅनर लावून शहर विद्रूप केल्याने सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. 68 बॅनर काढून जप्त करण्यात आले असून संबंधितांकडून 16 हजारांंचा दंड आकारण्यात आला.

असे आहे प्रकरण
महापालिकेने आठ दिवसापुर्वी शहरात विशेष मोहीम राबवली . त्यामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीची आचारसंहीता लागू होताच शहरातून राजकीय पक्षांचे बॅनर्स, झेंडे व होर्डिंग्ज हटविण्यात आले होते. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता संपताच अनधिकृत बॅनर मोठ्या प्रमाणात लावण्याचा धडाका सुरू झाला आहे. याची दखल घेत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी अतिक्रमण निर्मूलन पथक व किरकोळ वसुली विभागाला संयुक्त मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चारही प्रभागात 23 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवली. यात विना परवानगी लागलेले राजकीय पक्षांसह विविध व्यवसायांचे बॅनर्स हटविण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !