शिरसाळा मारोतीहून परतणार्‍या साकेगावच्या तरुणाचा अपघाती मृत्यू


Accidental death of a young man from Sakegaon returning from Shirsala Maroti साकेगाव (8 डिसेंबर 2024) : शनिवारचे औचित्य साधून शिरसाळा मारोतीच्या दर्शनाला गेलेल्या साकेगावातील 22 वर्षीय तरुणाचा दुचाकीची बैलगाडीला धडक बसल्यानंतर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास हरताळा फाट्याजवळ घडला. तुषार बंडू बाविस्कर (22, साकेगाव) असे मयताचे नाव आहे.

साकेगावात शोककळा
साकेगाव येथील चुडामण नगरातील रहिवासी तुषार बंडू बाविस्कर हा युवक त्याच्यासोबत एका मित्राला घेऊन बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे मारोतीच्या दर्शनाला गेला असता दर्शन आटोपून दुचाकीने घरी परत येत असतांना हरताळा फाट्याजवळ एका बैलगाडीला त्यांची दुचाकी धडकलीयावेळी खाली पडून तुषार जखमी झाला. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तुषारसोबत असलेला त्याचा मित्र जखमी झाला. मृत तुषारच्या पश्चात भाऊ असून त्याच्या आई-वडीलांचे निधन झाले आहे. दोघे भाऊ आजीजवळ राहत होते. तुषार एका कंपनीत नोकरीला असल्याचे सांगण्यात आले. तुषार बाविस्करच्या अपघाती निधनामुळे गावात शोककळा पसरली.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !