फैजपूरात न्याय यात्रेद्वारे जिहादी शक्तीचा निषेध
रोहिंग्या, बांगलादेशींनो परत जा : महामंडलेश्वर जनार्दन हरि महाराज
Protest against Jihadi power through Nyay Yatra in Faizpur फैजपूर (11 डिसेंबर 2024) ऐतीहासीक फैजपूर शहरात बांगलादेशातील हिंदू व अल्पसंख्यांक समाजावर धर्माच्या नावावर होणार्या अन्यायाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी मंगळवारी एकत्रीत होऊन बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन केले. आपल संतप्त भावना व्यक्त करीत फैजपूर प्रांतधिकारी बबनराव काकडे यांना निवेदन सादर केले.
यांचा होता सहभाग
याप्रसंगी अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज, मानेकर बाबा शास्त्री, शास्त्री अनंत प्रकासदासजी, इस्कॉनचे प्रभू कन्हैय्यादासजी, हभप प्रवीणदासजी, कन्हैया दासजी, आमदार अमोल जावळे, योगेश भंगाळे, अॅड.कालिदास ठाकूर, डॉ.शेखर पाटील, प्रतीक भिडे, भरत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

रोहिंग्यानो परत जाचा नारा
न्याय मोर्चाची सुरुवात खंडोबा मंदिरापासून झाली. विद्यानगरातील प्रांतधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. सभेला संबोधन करतांना महामंडलेश्वर जनार्दन हरिजी म्हणाले की, बांग्लादेशातील हिंदू व अल्पसंख्यांक जनतेवर होण्यारे अमानुष क्रूर अत्याचार खुले आम होत असताना ही जागतिक मानवधिकार संघटना आता फक्त बघायची भूमिका घेत आहे. या विरोधात आम्ही सारे संत व तमाम हिंदू समाजाला आज रस्यावर उतारावे लागले आहे. भारतातील रोहिंग्यावर जनतेने निर्बंध घालावे, रोहिंग्यानो परत जा, असा नारा त्यांनी दिला आहे. आघाडी सरकारचा माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांसारखा नितीभ्रष्ट नेता आज खुलेआम हिंदू समाजावर विघातक निंदनीय टीका टिपणी करीत महाराष्ट्रीय जनतेला वेढीस धरू पाहत आहे तसेच या परिसरातील तसाच नेता महाराजांविषयी चुकीचे व्यक्तव्य करीत असेल तर अश्या राक्षसी वृत्तीचा हिंदू समाज करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. भारत सरकाने जागतिक मानवधिकार संघटना व बांग्लादेश सरकारला संदेश द्यावा यासाठी हा न्याय मोर्चा असून यापुढे गरज भासल्यास आमचे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
हम सम हिंदू भाई-भाई
याप्रसंगी मानेकर बाबा, शास्त्री अनंतप्रकाशदासजी, प्रभू कनय्यादासजी, पवनदासजी यांनी मार्गदर्शनात जात-पात की करो बिदाई सब हिंदू भाई-भाई चा नारा दिला आहे. सूत्रसंचालन अॅड.कालिदास ठाकूर यांनी केले. याप्रसंगी सर्व पक्षीय सकल सनातन हिंदू समाजातील पदाधिकारी-कार्यकर्ते, महिला, पुरुष हजारोंच्या संख्येने आवर्जून सहभागी झाले.
या मागण्यांचा निवेदनात समावेश
10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस असल्याने ागतिक मानवाधिकार परिषदने हिंदूंवर होणार्या अन्याय अत्याचाराची कधीच दखल घेतलेली नाही. बांगलादेशात हिंदुंवर आणि अन्य अल्पसंख्य समुदायावर अनन्वित अत्याचार होत असून संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषद यावर सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. हिंदू समाजबांधव आज जगातील शंभरापेक्षा अधिक देशात कमी अधिक प्रमाणात वास्तव्य करीत असून हिंदू बांधवांवर जगात कुठेही अन्याय झाला तर त्याचा हिंदू समाजाकडून तीव्र निषेध आणि विरोध होईल हा संदेश पूर्ण जगात जाणे आवश्यक आहे. हिंदू समाज भारतात बहुसंख्य असला तरी जागतिक पातळीवर आपण अल्पसंख्य आहोत त्यामुळे संयुक्त राष्ट्राने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील आपल्या बांधवांना वाचवण्यासाठी भारत सरकाने देश पातळीवर प्रयत्न करावेत, असे निवेदनत नमूद आहे.

