भुसावळातील के.नारखेडे विद्यालयाचे शिक्षक एस.पी.पाठक यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
भुसावळ (19 डिसेंबर 2024) : शहरातील के.नारखेडे विद्यालयातील शिक्षक एस.पी.पाठक यांना रविवार, 15 रोजी बदलापूर येथील श्री बल्लाळेश्वर मंगल कार्यालयात प्रेरणा फाउंडेशन आणि प्रेरणा रंगमंच नाट्य मंडळ, बदलापूर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार समारंभात ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले.
मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव
प्रेरणा फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रेरणा कुलकर्णी व व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या हस्ते शिक्षक पाठक यांचा गौरव करण्यात आला. शिक्षक सुनील पाठक यांनी आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना मिळाला. यावेळी सोनाली सुनील पाठक उपस्थित होत्या. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, मनोज कुलकर्णी, भुसावळातील नामांकित बिल्डर चेतन पाटील, सर्व उपस्थित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत उपक्रमशील शिक्षक सुनील पाठक यांचा सहृदय सन्मान करण्यात आला.


