जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : दोन पिस्टलांसह संशयीत जाळ्यात
Performance of Jalgaon MIDC Police: Suspect caught with two pistols जळगाव (24 डिसेंबर 2024) : एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पिस्टल बाळगून दहशत निर्माण करणार्या शुभम अनंता राऊत (21, भगवा चौक, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यास अटक केली आहे. अटकेतील शुभम राऊत याने त्याचा मित्र बंटी तायडेकडे देखील एक पिस्टल दिल्याची कबुली दिल्यानंतर संशयीत बंटीचा शोध घेण्यात आला मात्र तो घरी आढळला नाही मात्र घरातून पिस्टल जप्त करण्यात आल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, छगन तायडे, गणेश ठाकरे, शिद्धेश्वर डापकर आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व योगेश घुगे करीत आहेत.


