अंजली दमानियांनी धनंजय मुंडेचा पिस्टल धरलेला फोटो केला पोस्ट : पाय आणखीनच खोलात !


Anjali Damania posted a photo of Dhananjay Munde holding a pistol बीड (26 डिसेंबर 2024) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तूल असलेला एक व्हिडिओ पोस्ट करीत हे असले बॉस? असा प्रश्न उपस्थित करत बीडमधील सर्वच शस्त्र परवान्यांची ताबडतोड चौकशी लावण्याची मागणी केली आहे.

कायदा सुव्यवस्थेवर ठेवले बोट
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटलेत. विशेषतः मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव या प्रकरणात आल्यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दोन व्हिडिओ ट्वीट
अंजली दमानिया गुरुवारी दोन व्हिडिओ ट्विट केले. यापैकी एका व्हिडिओत धनंजय मुंडे व त्यांचे विश्वासू वाल्मीक मुंडे कारमध्ये बसल्याचे दिसून येत आहे. या कारचे सारथ्य स्वतः मुंडे करत असून, वाल्मीक कराड त्यांच्या शेजारी बसल्याचे दिसत आहेत. दुसर्‍या व्हिडिओत धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तुल असल्याचा फोटो व त्यामागे एक गाणे ऐकू येत आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
अंजली दमानिया आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे यांच्या या कृतीवर संताप व्यक्त करत म्हणाल्या, हे असले बॉस? इन्स्टाग्रामवर अशी रिल्स दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का? हे देशाबद्दल र्ींळीळेप असणार आहे का? ताबडतोब बीड मधील सगळ्या शस्त्र परवान्यांची चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, असे त्या म्हणाल्या.

 


कॉपी करू नका.