पाच हजारांची लाच मागणी भोवली : नाशिक क्राईम ब्रँचचा सहा.उपनिरीक्षक जाळ्यात


Sixth Sub-Inspector of Nashik Crime Branch caught in a bribery case of Rs. 5,000 नाशिक (27 डिसेंबर 2024) : भंगार चोरी प्रकरणातून बाहेर काढण्यासह प्रकरण मिटण्यासाठी पाच हजारांची लाच मागणी नाशिक क्राईम ब्रॅचच्या युनिट दोनमधील सहा.उपनिरीक्षकाच्या अंगलट आली आहे. नाशिक एसीबीने या संदर्भात गुन्हा दाखल करीत संशयीताला अटक केली आहे. राजेंद्र सोपान घुमरे (56, प्लॅट नं. 4, राधा शिल्प अपार्टमेंट, गणेशनगर, द्वारका, नाशिक) असे अटकेतील सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण
37 वर्षीय तक्रारदार भंगार व्यावसायीक आहेत. 9 ऑक्टोबर 2024 रोजी नाशिक क्राईम ब्रांच युनिट दोनच्या आवारात घुमरे यांनी चोरीचे नळाचे वॉल भंगारात 15 हजार रुपये खरेदी केल्याप्रकरणी गुन्ह्यातून सुटण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजारांची मागणी केली तसेच त्यांच्या सोबतच्या पोलिसांना कारवाई न करण्यासाठी सांगण्याकरिता व चोरीचा वॉल घेतल्याचे प्रकरण मिटवून टाकण्यासाठी फिर्यादीकडे पाच हजारांची लाच मागितली मात्र संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र अहवाल येताच शुक्रवारी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
पोलीस एसीबीचे निरीक्षक मीरा अदमाने, हवालदार संदीप वणवे, हवालदार योगेश साळवे, अविनाश पवार, संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने कारवाई केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !