धुळे जिल्ह्यातील सोलर केबल चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव (7 जानेवारी 2025) : जळगाव गुन्हे शाखेने धुळे जिल्ह्यात सोलर केबलची चोरी करणार्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. चोरीप्रकरणी मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. गोकुळ हिरामण कोरडकर (25), भावडू जानकू थोरात (24), जिभाऊ वामन थोरात (28, सर्व रा.रायपूर, ता.साक्री, जि.धुळे), गोकुळ राजेंद्र भामरे (24) राकेश धनराज पाटील (24, दोन्ही रा.कापडणे, जि.धुळे) अशी आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, गोरख बागुल, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बैसाणे, दीपक चौधरी, महेश सोमवंशी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील चोरट्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. आरोपींना मारवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.