भुसावळात आरोग्य तपासणी शिबिरात हजारावर नागरिकांनी घेतला लाभ
शंभूराजे ग्रुप व मुस्कान हॉस्पीटलचा संयुक्त उपक्रम : रुग्णांना मोफत औषधींचे वाटप

भुसावळ (23 फेब्रुवारी 2025) : शंभूराजे ग्रुप व मुस्कान हॉस्पीटलद्वारा भव्य आरोग्य शिबिराचे प्रभाग क्रमांक 13 मध्ये आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले. माजी नगराध्यक्ष व भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी उपस्थित होते. शिबिरत एक हजारावर नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधी वितरण करण्यात आले. शिबिरात सर्व प्रकारच्या रक्त तपासणी केल्यानंतर आवश्यक असलेल्या रुग्णांचा ईसीजी रिपोर्ट काढण्यात आला.
आरोग्य शिबिरात उद्योजक मनोज बियाणी, माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू, राहुल तायडे, गौरव वाघ आदींची उपस्थिती होती.
यांनी घेतले परिश्रम
या शिबिराचे संयोजक व माजी नगरसेवक राजेंद्र दत्तु आवटे, गौरव राजेंद्र आवटे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराकरीता किशोर टोके, शिव कैथवास, राजेश चंदन, वेद ओझा, विशाल महाजन, जय तोकडे, लाजरस मनी, अंकुश वावरे, शुभम अहिरे, संदीप यादव, योगेश वाघ, बंटी धुमाळ, अतुल बढे, श्वेतान्ग चंदेल आदींनी परिश्रम घेतले.
