अ.भा.उपभोक्ता उत्थान संघटनच्या राज्य प्रदेशाध्यक्षपदी प्रा.विनोद गायकवाड


भुसावळ (23 फेब्रुवारी 2025) : भारत सरकार मान्यता प्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन (ग्राहक संरक्षण) चे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्लीत झाले. या अधिवेशनात भुसावळातील प्रा.विनोद गायकवाड यांची संघटनच्या राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन
विधी न्याय आणि कंपनी मामले भारत सरकार मंत्रालयद्वारा अखिल भारतीय ग्राहक संरक्षणचे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली 15 जनपदमध्ये झाले. मुख्य अतिथी गंगोत्री धामचे जगतगुरू अनंत श्री वर्या, श्री नारायण तीर्थ दंडी महास्वामी, श्री हरीप्रसाद स्वामीगल, जर्मनीचे मार्क एक्स जेड.वाय.जर्मन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.हरिशंकर शुक्ल यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी आणि आंतरराष्ट्रीय उपभोक्ता कमिटीद्वारा ग्राहक संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल 2024-2025 मध्ये प्रथम क्रमांक आणि महाराष्ट्र राज्याला द्वितीय आणि गुजरात तृतीय क्रमांक मिळाला. प्रथम क्रमांक मध्यप्रदेश, द्वितीय महाराष्ट्र तर तृतीय पुरस्कार गुजरात राज्याने पटकावला. यावेळी महाराष्ट्राचा द्वितीय पुरस्कार प्राचार्य डॉ.विनोद हिम्मतराव गायकवाड यांना प्रदान करण्यात आला तसेच भारत सरकार मान्यता प्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन (ग्राहक संरक्षण) मधे प्राचार्य डॉ.विनोद हिंमतराव गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य सचिव पदावर सन 2010 पासून उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल संपूर्ण भारतातील ग्राहक संरक्षण पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !