दहावी मराठीच्या पेपरात शुद्धलेखनाच्या गंभीर चुका : प्र.ह.दलाल


भुसावळ (24 फेब्रुवारी 2025) : दहावी परीक्षेला शुक्रवार, 21 पासून सुरूवात झाली. पहिल्याच मराठी पेपरात यंदाही मोठ्या गंभीर चुका समोर आल्याचा दावा शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिष्यवृत्ती, बारावी आणि दहावी शालांत परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सदोष काढण्याची आपली सुमारे पंधरा वर्षांपासूनची आपली परंपरा यावर्षी देखील संबंधित बेजबाबदार अधिकार्‍यांनी निष्ठेने निभावली आहे, असा थेट आरोप भुसावळ येथील प्र.ह.दलाल यांनी केला आहे.

नियमबाह्य लेखन
शासनाच्या 10 नोव्हेंबर 2022 च्या आदेशानुसार अंक लेखन करताना इंग्रजी अंक न वापरता, 1,2,4 असे मराठी अंक लिहावे, अशी स्पष्ट सूचना असताना सदर प्रश्नपत्रिका मात्र सर्वत्र, 1,2,4,.. असे इंग्रजी अंक सर्रास वापरलेले आहेत. शासन आदेशानुसार श, आणि ल ही अक्षर वळणे चुकीची आहेत, प्रश्नपत्रिकेत, दविगु, जिद दी, प्रसीदध, दवार, याप्रमाणे तोडा क्षर पद्धती वापरली असून नियमानुसार ते शब्द द्विगु, द्वंद्व, द्वार, पद्धती, प्रसिद्ध, जिद्द अशी असायला हवीत, द हे व्यंजन जोडाक्षरात आधी आल्यास व त्यापुढे य आल्यास, दय असे न लिहिता द्य, असे लेखन करावे हा नियम झुगारून सर्वत्र विं द य, गद् य, दया वे, विद्ापीठ असे नियमबाह्य लेखन केले आहे. सुरुवातीलाच सूचना क्रमांक पाच मध्ये लेखन नियमांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे हे संपूर्ण वाक्यच मुळात लेखन नियमानुसार नाही.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !