जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : चोरीच्या दोन बुटेटसह अट्टल चोरट्यांना बेड्या

Jalgaon MIDC police take major action: Two stolen bottles along with two stubborn thieves arrested जळगाव (26 फेब्रुवारी 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल बुलेट चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून एक लाख 30 हजार रुपये किंमतीच्या दोन बुलेट जप्त करण्यात आल्या असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. जावेद शेख चांद (रा.मास्टर कॉलनी, जळगाव) व अदनान अमजद खान (शाहुनगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील सिंधी कॉलनीजवळील बाबा कॉलनीतून 13 नोंव्हेबर 2024 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास हर्षद दिलीपकुमार नाकपाल यांच्या मालकीची बुलेट (क्रमांक एम.एच.19 सी.एच.4898) राहत्या घरासमोरून चोरी झाली होती. या प्रकरणी नाकपाल यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. गुन्हे शोध पथकातील योगेश बारी, विकास सातदिवे, नाना तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांना बुलेट चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोघा संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरी केलेली बुलेट काढून दिली. न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर आरोपींनी पुन्हा मास्टर कॉलनी भागातून एक चोरी केलेली बुलेट काढून दिली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक किशोर पाटील, योगेश बारी, विकास सातदिवे, नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांनी केली. तपास किशोर पाटील करीत आहेत.
