पवना नदीला पूर ; अनेक गावांचा संपर्क तुटला
पुणे : पवना धरणातून सोडण्यात आलेले पाणी व मावळात पडत असलेला मुसळधार पाऊस कोसळत असल्याने किवळे, मामुर्डी , गहुंजे व सांगवडे परिसरात पवना नदीला पूर आला आहे. धामणेतील पूलासह गहूंजे-साळुंब्रे, मामुर्डी-सांगवडे हे दोन्ही साकव पूल पाण्याखाली गेले आहेत तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पवना नदी पात्र सोडून वाहत आहे. नदीलगतच्या सखल भागासह शेतात मोठ्या प्रमाणात पाणी पसरले आहे. भात खाचरे वाहून गेली आहेत. रावेत बंधार्याहून जोरदार पाणी वाहत आहे. धामणे, सांगवडे व गहूंजेसह महापालिकेच्या मामुर्डी व किवळेतील स्मशानभूमी, निवारा शेड पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे