किनगाव गावाजवळ एस.टी बस व दुचाकीचा अपघात वयोवृद्ध ठार


Elderly man killed in ST bus and bike accident near Kingaon village यावल (27 मार्च 2025) :  यावल तालुक्यातील किनगावजवळ दुचाकी आणि एस.टी. बसचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या किनगावातील 62 वर्षीय वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक यशवंत सपकाळे (62) असे मृताचे नाव आहे.

काय घडले नेमके ?
किनगाव, ता.यावल गावाजवळ जळगाव येथून एस.टी.बस (क्रमांक एम. एच. 14 बी.टी. 2144) घेऊन चालक यावलकडे येत असताना किनगाव गावाबाहेर कृषी विद्यालयाच्यासमोर एस.टी. बस आणि मोटरसायकल (क्रमांक एम. एच. 19 ए.टी. 8588) व्दारे किनगाव गावाकडे जात असलेल्या अशोक यशवंत सपकाळे (62) यांचा अपघात घडला. या अपघातात त्यांच्या डोक्याला, पायाला जबर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताचं हायवे मृत्युंजयदूत सचिन तडवी, बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, गुड्डू पिंजारी यांनी जखमी अवस्थेत सपकाळे यांना किनगाव रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ.दर्शना निकम, मोहिनी धांडे, भाग्यश्री भारंबे, सरदार कनाशा यांनी त्यांच्यावर तातडीने प्रथम उपचार केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात देण्यात आले.





जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भुषण सपकाळे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनील पाटील हे पथकासह दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त एस.टी. बस आणि दुचाकी ही तेथून पंचनामा करून यावल पोलीस ठाण्यात लावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !