शेतातील कडब्याला भीषण आग : शेतकर्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

Massive fire breaks out in a field: Farmer dies of burns चोपडा (19 मे 2025) : शेतातील कडब्याला भीषण आग लागून या आगीत शेतकर्याचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 17 रोजी चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथे दुपारी उघडकीस आली. पंडित डोमन रायसिंग (65) असे मयताचे नाव आहे.
काय घडले नेमके
शेतकरी पंडित रायसिंग हे शनिवारी सकाळी आपल्या शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शेतातील कडब्याला अचानक आग लागली. ते धुराच्या व आगीच्या तडाख्यात सापडल्याने होरपळून जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. पंडित हे दुपारपर्यंत घरी आले नाहीत त्यामुळे घरातील मुले त्यांना बघायला शेतात गेली असता ते जळालेल्या व मयत स्थितीत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच भाऊबंदांनी शेताकडे धाव घेत मृतदेह घरी आणला. मयत शेतकर्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.

