बोदवडमध्ये राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

बॅनरवरील फोटोमुळे तालुक्यात राजकीय खलबते
बोदवड : महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भात शनिवारी जाणार असून शनिवारी सकाळी अकरा वाजता त्यांचे बोदवड येथे आगमन होत आहे. यानिमित्त बोदवड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच भाजपाचे वर्चस्व असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागतपर फलक शहरात जागोजागी लावण्यात आले आहेत. त्यातच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल चौधरी यांच्या व्यावसायीक दुकानावर लावण्यात आलेल्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्रभैय्या पाटील यांचा फोटो आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हा तर भाजपाचा खोडसळपणा -रवींद्र भैय्या
फोटो चित्रीकरणाबाबत मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. हा भाजपाने केलेला खोडसरपणा आहे याची चौकशी करण्यात यावी, असे अॅड.रवींद्र भैय्या पाटील म्हणाले तर सेल परचेस चेअरमन रवींद्र कृष्णाजी वराडे यांच्याशी संपर्क साधला असता होवू शकला नाही.
