भुसावळात लवकरच होणार डांबरी रस्ते : मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी


डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणांच्या विकासासह कोळी समाजाच्या अडचणी सोडवण्याची ग्वाही

भुसावळ : अमृत योजनेमुळे भुसावळ शहरातील रस्त्यांची वाताहत झाल्याची बाब आमदार संजय सावकारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विशेष बाब म्हणून आठ दिवसात भुसावळ शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होण्यासाठी परवानगी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे देत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणांच्या (डी.एस.ग्राऊंड) विकासासाठी 24 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी व दीपनगरातील नवीन 660 प्रकल्पात 80 टक्के स्थानिकांना रोजगार देण्याची घोषणा केली. महाजनादेश यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिराने अर्थात सायंकाळी सहा वाजता त्यांची सभा सुरू झाली. याप्रसंगी ढोल-ताशांच्या गजरात तसेच भजनी मंडळांच्या सहभागाने मुख्यमंत्र्यांचे वाजत-गाजत सभा स्थळापर्यंत स्वागत करण्यात आले.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल, आमदार गुरूमुख जगवाणी, जिल्हाध्यक्ष संजवी पाटील, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे, गटनेता मुन्ना तेली, उद्योजक मनोज बियाणी, विजय चौधरी, अजय भोळे, युवराज लोणारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.