निष्ठावंतांना डावलून पक्ष विरोधात बोलणार्‍यांना संधी : एकनाथराव खडसे


विधान परीषदेचे तिकीट कापल्यानंतर नाथाभाऊंनी व्यक्त केली भावना

मुक्ताईनगर : निष्ठावंताना डावलून पक्षाविरुद्ध कार्य करणार्‍यांना भाजपा पक्षाने तिकीट दिले असून गेल्या 40 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं इमाने-इतबारे काम करीत असून पक्षाच्या जडण-घडणीत आम्ही अनेक चढ-उतार पाहिले आहेत त्यामुळे एकनिष्ठ म्हणून आम्हाला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती मात्र, भाजपाविरोधी काम करणारे, गो बॅकच्या घोषणा देणार्‍यांना संधी देण्यात आली ,अशी टिका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली. विधान परीषदेसाठी खडसे यांच्यासह पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा असतानाच नवीन चेहर्‍यांना संधी मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर खडसेंनी आपली भावना व्यक्त केली.

राजकीय पुर्नवसन पुन्हा लांबले
भाजपाने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना विधान परीषदेची उमेदवारी दिल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !