पक्षांतराबाबत माजी मंत्री खडसे म्हणाले, ‘वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका’


राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून दबाव वाढत असल्याची प्रांजळ कबुली

मुक्ताईनगर : विधान परीषदेचे तिकीट कापण्यात आल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे आता पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे मात्र खडसेंनी या संदर्भात सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका असल्याचे सांगत राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून पक्ष सोडण्याबाबत दबाव वाढला असल्याची प्रांजळ कबुली दिली.

पक्ष सोडण्याचा अद्याप विचार नाही : खडसे
माजी मंत्री खडसेंशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितले की, सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका आहे मात्र राज्यभरातील कार्यकर्त्यांचे आपल्या दूरध्वनी येत असून अस्वस्थ करणारा निर्णय झाला असून आता किती अन्याय सहन करायचा, इतका अपमान सहन का सहन करायचा? असा प्रश्‍न कार्यकर्ते उपस्थित करीत असून आता पक्ष सोडाच, असा आग्रहही कार्यकर्ते धरत असल्याने दबाव वाढला असल्याची प्रांजळ कबुली खडसेंनी दिली.



नवीन चेहर्‍यांना संधी दिल्याने खडसे नाराज
गेल्या 40 ते 42 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे इमाने-इतबारे काम करणार्‍या खडसेंना विधानसभेचे तिकीट डावलून पक्षाने त्यांची कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना इच्छा नसताना तिकीट दिल्याने त्यावेळीदेखील खडसे नाराज झाले होते शिवाय त्यावेळीदेखील कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा आग्रह धरला होता मात्र खडसेंनी त्यावेळीदेखील सबुरीचा सल्ला दिला होता तर विधान परीषदेसाठी स्वतः खडसे यांनी उत्सुक असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनादेखील पक्षाने वर नाव पाठवण्यात आल्याचे आश्‍वासन दिले मात्र प्रत्यक्षात पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या खडसेंसह पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलून माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ.अजित गोपछेडे यांना विधान परीषदेची उमेदवारी दिल्याने निष्ठावंत नेत्यांमधून नाराजीचे सूर उमटले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !